प्रोबेबल्सचा सिद्धार्थ पारिख चमकला

0

मुंबई । सिद्धार्थ पारिखने नोंदवलेल्या बिनतोड 193 गुणांच्या ब्रेकमुळे हिंदू जिमखाना प्रोबेबल्स संघाने चेंबुर जिमखाना आयोजित बिलीयर्डस लीग स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले. सिद्धार्थच्या संयत आणि तेवढ्याच आक्रमक खेळाच्या जोरावर प्रोबेबल्स संघाने गरवारे क्लब हाऊसच्या गरवारे अ संघाचा 552-500 असा पराभव केला. प्रोबेबल्सच्या रॉविन डिसोझाने संघाला चांगली सुरुवात करुन देताना चिराग मेहताचा 200-127 असा पराभव केला.

सिद्धार्थचा एकतर्फी विजय
त्यानंतर दुसर्‍या लढतीत आशियाई सुवर्णपदक विजेत्या सिद्धार्थने अमर पारिखला डोके वर काढण्याची संधी मिळू दिली नाही. दुसर्‍या फ्रेममध्ये बिनतोड गुण मिळवत सिद्धार्थने हा सामना 200-0 अशा फरकाने जिंकला. अन्य लढतीत एलफिस्टन क्रिकेट क्लबच्या एल्फी स्टार्स संघाने शिवाजीपार्क जिमखान्याच्या जेंटलमन संघाचा 644-592 असा पराभव केला.

निकाल – एसीसी एल्फी स्टार्स विजयी विरुद्ध एसपीजी जेंटलमन ( अनुराग बाग्री विजयी विरुद्ध प्रमोद कुलकर्णी 200- 127, सायरस मिस्त्री पराभूत विरुद्ध संकेत बापट 139-200, महेश जगदाळे विजयी विरुद्ध सुशांत मांजरेकर 200-53).