मुंबई : आयपीएलप्रमाने लोकप्रिय ठरलेल्या प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वाला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ५ ऑक्टोबर ते ५ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यावर्षी १२ संघ खेळणार आहेत. १३ आठवडे ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेसाठी ३० आणि ३१ मे रोजी खेळाडूंचा लिलाव झाला होता.
पहिला सामना तेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवाज यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर अंतिम सामन्याची लढत ५ जानेवारीला मुंबईत होणार आहे.