प्रो-कबड्डीमध्ये सचिन तेंडुलकरचा संघ

0

चेन्नई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात एक संघ मालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या पर्वात चार नवे संघ सामील होणार आहेत. यातील एक फ्रॅँचायझी सचिनच्या मालकीची असणार आहे. चेन्नईच्या फ्रॅँचायझीचा सचिन सह-मालक असणार असून संघाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. येत्या जुलै ते ऑक्टोबरमध्ये प्रो-कबड्डीचे पाचवे पर्व खेळवले जाणार आहे.

सचिनसोबतच यंदात जेएसडब्ल्यू ग्रुप, अदानी ग्रुप आणि जीएमआर ग्रुप यांच्या मालकीचे अनुक्रमे हरयाणा, गुजरात आणि उत्तरप्रदेश असे संघ असणार आहेत. प्रो-कबड्डीमध्ये नव्या फ्रँचायझीचे स्वागत करताना स्टार इंडियाचे चेअरमन उदय शंकर यांनी देशाच्या रांगड्या खेळाच्या वाढीसाठी पुढाकार घेतलेल्या संघ मालकांचे आभार व्यक्त केले.