‘प्रो कबड्डी’ लीगमध्ये 4 संघांचा नव्याने समावेश

0

मुंबई । भारतीय खेळ असलेला कबड्डी आला आजपर्यंत लाल मातीत खेळला जाणारा खेळ म्हणून ओळख होती.मात्र या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला.तरी आपण त्यामध्ये कमी पडत असे चांगल्या प्रतिभा असून ही कबड्डी खेळात आपण यश कमी पडत असो मात्र प्रो कबड्डी सुरू झाल्यापासून अनेक प्रतिभावंत खेळाडू समोर आले त्याचबरोबर पैसा ही या खेळाडूंना मिळू लागला.त्याचबरोबर विदेशी खेळाडूबरोबर खेळण्याचा वेगळाच आनंद मिळू लागला.त्याची लोकप्रियता पाहता यंदा प्रो कबड्डी लीगमध्ये चार नवीन संघाचा समावेश करण्यात आला आहे.

बारा संघ खेळताना दिसतील
प्रो कबड्डी हा खेळ लाल मातीच्या मैदानावर न होता तो मॅटवर होत आहे. त्यामधील बारकावे समजत आहे.प्रो कबड्डी लीगला प्रतिसाद पाहता यावेळी चार नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे.प्रो कबड्डी लीगमध्ये जुलैमध्ये प्रारंभ होणार आहे. या मोसमात चार नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे. नव्या संघांमध्ये तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरयाणाचा समावेश आहे. त्यामुळे आयपीएलच्या पाचव्या मोसमात यंदा आठऐवजी बारा संघ खेळताना दिसतील.लीगमधल्या एकूण सामन्यांची संख्या 130 वर जाईल.हा मोसम तेरा आठवड्यांचा असेल. विशेषत: तरुणांनी तर प्रो कबड्डी लीगला अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. कबड्डीला सेलिब्रेटी टच आणि ग्लॅमर मिळाल्याने एरवी कुठेही चर्चा नसलेल्या या खेळाबद्दलचं आकर्षणही प्रचंड प्रमाणात वाढले आहे.