प्रौढाची विषारी औषध सेवन करीत आत्महत्या

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील प्रौढाने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उत्तम शामराव कोळी (६०, ओझरखेडा) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
उत्तम कोळी यांनी रविवार, ११ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता काहीतरी विषारी द्रव प्राशन केल्याने त्यांना उपचारार्थ जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी सीएमओ डॉ.नितीन विसपुते यांच्या खबरीनुसार वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.