प्रौढ महिलेचा बंद घरात आढळला मृतदेह : संभाजी नगरात खळबळ

जळगाव : 54 वर्षीय प्रौढ महिलेचा बंद घरात मृतदेह आढळून आल्याने शहरातील संभाजी नगरात खळबळ उडाली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लिलाबाई यादव इंगळे (54, रा.संभाजी नगर, जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

राहत्या घरात आढळला मृतदेह
लिलाबाई इंगळे या संभाजी नगरात वास्तव्याला होत्या. त्या भुसावळ येथे नोकरीला होत्या. अविवाहित असल्याने त्या संभाजी नगरात घरी एकट्याच राहत होत्या. मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घरात लिलाबाई इंगळे याचा मृतदेह मयतस्थितीत आढळून आला. शेजारी राहणार्‍या नागरीकांना दुर्गंधी आल्याचे हा प्रकार उघडकीला आला. याबाबत रामानंदनगर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आल. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी दिली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवार, 17 ऑगस्ट रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.