प्लास्टिक मुक्तचा संकल्प

0

पिंपरी : ई वेस्ट, काच, कागद, प्लास्टिक अशा वर्गीकण करणा-या कचराकुंड्या आता पिंपळे सौदागर येथील दुकानांमध्ये, सोसायटीमध्ये दिसत आहेत. पिंपळे सौदागर नागरिकांनी प्लास्टिकमुक्त पिंपळे सौदागर संकल्प केला आहे. यामध्ये 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षापासून नागरिक व दुकानदार कापडी पिशवीचाच वापर करणार आहेत.

गेल्या महिनाभरापासून नागरिकांची तयारी केली. त्यासाठी परिसरात अबालवृद्धांनी जनजागृती रॅली देखील काढल्या होत्या. प्लास्टिक मुक्त पिंपळे सौदागर करण्याचा चंग इथल्या रहिवाशांनी बांधला असून येत्या 1 जानेवारी 2018 पासून प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा संकल्प नागरिकांनी घेतला आहे. 1 जानेवारीपासून दुकानात खरेदीसाठी जाताना कापडी पिशवी घेऊन जायची. तसेच एखादा दुकानदार प्लास्टिक पिशवीत सामान देत असेल तर त्याला रोखायचे अशा प्रकारची ही संकल्पना आहे. यामध्ये पिंपळे सौदागरमधील धनश्री मेडिकल, झी मार्ट, स्वीट मार्ट आणि अन्य बर्‍याच दुकानांनी संमती दिली आहे.