यावल। प्लॅस्टीच्या वस्तुंचा वाढणारा अतिरेकी वापर ही एक समस्या ठरत आहे. प्लॅस्टीक हा अविघटनशिल पदार्थ असल्याने शहर व परिसरात ठिकठिकाणी प्लॅस्टीक कचर्याचे ढीग दिसतात. त्यामुळे न्हावी लग्न समारंभ आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमात यापुढे प्लास्टिकची कोणतीही वस्तू वापरण्याचा निर्णय न्हावीतील ग्रामस्थांनी घेतला आहे.
या विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये बैठक झाली. सरपंच आरजू तडवी, उपसरपंच नितीन चौधरी यांच्यासह मसाकाचे चेअरमन शरद महाजन यांनी प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांची माहिती दिली. डॉ.प्रमोद पाटील, अविनाश फिरके, प्रल्हाद बोरोले, गीता वारके, आलिशान तडवी, यशवंत तळेले, सुनील भोगे, शशिकांत चौधरी उपस्थित होते.