प्लुटोवर बर्फाच्छादित पृष्ठभाग

0

नवी दिल्ली । अंतराळ संशोधन संस्था नासाने प्लुटो ग्रहासंदर्भात 2006 मध्ये सुरू केलेल्या मोहिमेतून आता विलक्षण निष्कर्ष निघत असून या ग्रहावर डोंगररांगा आणि पृष्ठभागावर आच्छादिलेला बर्फ आढळला आहे. त्याचे व्हिडिओच नासाने व्हायरल केले आहेत. नासाच्या प्लुटोविषयक अहवाल तयार करण्याचे काम 2015 पर्यंत सुरू होते.त्यासाठी 1200 फोटोंचा आणि इतर माहितीचा 10 गिगाबाईट रेकॉर्ड अंतराळ तज्ज्ञांनी तपासला. तेथील प्रकाशात वेगवेगळे रंगही आढळले.

महासागर असेल
त्यांना प्लुटोच्या पृष्ठभागावर निळसर छटा असलेला बर्फ दिसून आला. त्यांच्या मते या बर्फाखाली महासागर असला पाहिजे. प्लुटोचे चंद्र सारख्याच वयाचे आहेत. लाखो वर्षांपूर्वी त्यांची उत्पत्ती झाली. प्लुटो सूर्यमालिकेतील नववा ग्रह मानला जात होता.