प्लॅटिकच्या फुलांवर बंदीचे आवाहन

0

पुणे : यंदा शहरात साजर्‍या होणार्‍या गणपती आणि गौरीच्या उत्सवादरम्यान प्लॅस्टिकच्या चिनी फुलांवर बंदी आणण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. मनसेचे सभासद वसंत मोरे यांनी महापौर मुक्ता टिळक यांना याबाबतचे पत्र दिले आहे. शहर स्मार्ट सिटीकडे मार्गक्रमण करत असताना इथे साचणारे प्लॅस्टिक नष्ट करणे ही मोठी समस्या आहे. त्यामुळे असा निर्णय घेतल्यास भविष्यतील हा प्रश्‍नही मार्गी लावता येणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे चिनी फुलांवर बंदी घालून कर्जात बुडत चाललेल्या फूल उत्पादक शेतकर्‍यांना मदत करावी अशी विनंती मनसेने केली आहे.