प्लॅट घेण्यासाठी 50 लाख रुपये न आणल्याने जळगावातील विवाहितेचा छळ

जळगाव : पुणे शहरात नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 50 लाख रुपये न आणल्याने जळगावच्या मेहरूण भागातील विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी औरंगाबादस्थित पतीसह चौघांविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
शहरातील मेहरूण परीसरातील शिरसोलीरोड येथील रहिवासी भारती श्रेयस बांठीया (32) यांचा विवाह औरंगाबाद येथील श्रेयश नितीन बांठिया यांच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले त्यानंतर पुण्याला फ्लॅट घ्यायचा असल्याने भारतीने माहेरहून 50 लाख रुपये आणावेत, अशी मागणी पतीसह सासरच्यांनी केली. याच कारणावरून भारतीचा पतीसह सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून भारती या माहेरी बाल्या. याबाबत भारती बांठिया यांनी रविवारी दिलेल्या तक्रारीवरून पती श्रेयस बांठिया, सासरे नितीन बांठिया सासू जयश्री बांठिया, दीर शशांक बांठिया (सर्व रा. जयहिंद कॉलनी तापडिया नाट्यमंदिर जवळ, औरंगाबाद) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहेत.