चाळीसगाव । आमदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतुन नगरपरिषदेतर्फे ’प्लॅस्टिकमुक्त शहर आमचे’ आणि ‘देवराई’ या अभियानांचा शुभारंभ प्रख्यात अभिनेते तथा सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांचेहस्ते करण्यात आला. अभियानाचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून तीनदा महाराष्ट्र केसरी डीवायएसपी विजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.