22 किलो प्लॅस्टीक साहित्य जप्त : दुकानदारास पाच हजार रुपये दंड
भुसावळ- प्लॅस्टीक कॅरीबॅगवर शासनाने बंदी आणल्यानंतर भुसावळात सर्रास कॅरीबॅग विक्री व वापर सुरू असल्याने पालिका प्रशासनातर्फे दुकानांची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी शहरातील अमरदीप टॉकीज परीसरातील एका दुकानातून 22 किलो प्लॅस्टीक कॅरीबॅग व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. दुकानदार कैलास अशोक अग्रवाल यांना पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला. प्रभारी आरोग्याधिकारी निवृत्ती पाटील, आरोग्य निरीक्षक पी.डी.पवार, आरोग्य निरीक्षक वसंत राठोड, संजय सुरवाडे, सतीश बेदरकर आदींनी ही कारवाई केली.