कॅरीबॅग आढळल्यास दंडात्मक कारवाई -विपुल साळुंखे
फैजपूर- राज्य सरकारने प्लास्टिक बंदी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. या संदर्भात फैजपूर पालिकेत शनिवारी सकाळी 11 वाजता शहरातील व्यापारी यांना बोलावून बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्लास्टिक बंदी, स्वच्छ भारत अभियान आणि अतिक्रमण धारकांना बोलावण्यात आले. राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा काढलेला अध्यादेश वाचून दाखवण्यात आला. यात प्लास्टिक कॅरीबॅग, ग्लास, चमचे, डिशा व थर्माकोल या वस्तूवर सरसकट बंदी घेण्यात आली आहे आणि किराणा दुकानासाठी आवश्यक असलेले 50 मायक्रोन जाडीची आणि त्यावर विक्री करणार्याचे नाव असणे बंधनकारक आहे.
दुसर्यांदा झाली बैठक
प्लॅस्टीक बंदी संदर्भात ही दुसरी बैठक घेण्यात आली असली तरी गावात काही व्यावसायीक प्लास्टिक पिशवीचा सर्रास वापर करत असल्याचे पालिकेच्या निर्दशनात आले आहे. शहरात सर्व व्यापार्यांना सूचना करण्यात आल्या असून कुणाच्या दुकानात चहाचे प्लास्टिक ग्लास, डिशा, वाट्या, चमचे, प्लास्टिक पिशवी अन्य प्लास्टिक वस्तू आढळल्यास पालिका त्या व्यापारावर कारवाई करण्यात येईल, असे स्वच्छता आणि पाणी पुरवठा अधिकारी विपुल साळुंखे यांनी सांगितले
अतिक्रमण धारकांवर होणार कारवाई
ज्या व्यावसायिकांनी दुकानाच्या बाहेर नियमाच्या बाहेर अतिक्रमण केले असेल अशा व्यावसायिकांवर दंडात्मक कार्यवाई करण्यात येईल तसेच मालमत्ता धारकांची सुद्धा तपासणी करून अतिक्रमण मालमत्ता धारकानावर पालिका प्रशासनाकडून कार्यवाई करण्यात येणार असल्याचे बांधकाम अभियंता शेख यांनी सांगितले.
ओला कचरा व कोरडा कचरा वेगळा करा
व्यासायिकांनी आपल्या दुकानातील ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा करून सकाळी पालिकेच्या घंटा गाडीत टाकावा, दुकानातील कचरा कोणीही गटारीत किंवा रस्त्यावर टाकू नये जे कोणी नियमांचे पालन करणारा नाही अशा व्यवसायिकांनावर दंडात्महक कार्यवाई करण्यात येईल. यावेळी काही व्यापार्यांनी सूचना मांडल्या.
210 व्यावसायिकांना बैठकी संदर्भात नोटीस
शनिवारी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात व्यापार्यांना बैठकी संदर्भात शहरातील 210 व्यापार्यांना बोलावण्यात आले होते परंतु या महत्वाच्या बैठकीसाठी फक्त शहरातून 40 च्या जवळपास व्यापारी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी उपनगराध्यक्ष कलीम मण्यार, नगरसेवक रशिद तडवी, अमोल निंबाळे, देवेंद्र साळी, स्वछता व पाणी पुरवठा अधिकारी विपुल साळुंखे, बांधकाम अभियंता शेख, शेख इम्रान, विक्की बागुल व्यापारी असोशियनचे अध्यक्ष लेखराज बदलानी यासह व्यापारी उपस्थित होते. सूत्रसंचलन लेखपाल संजय बानाईते यांनी केले.