Harassment of married woman for not bringing 20 lakhs to buy Plot : Crime against husband and three भुसावळ : प्लॉट घेण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये न आणल्याने शहरातील माहेर व अहमदनगर येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासु-सासर्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगरच्या आरोपींविरोधात गुन्हा
नेहा गणेश डोळसकर (26, न्यू म्हाडा कॉलनीसमोर, गिरजा विहार, अहमदनगर, ह.मु.मंगल शारदा, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, पतीसह सासरच्यांनी प्लॉट घेण्यासाठी 20 लाख रुपये छळ केला तसेच शिविगाळ करून मारहाण केली. 5 मार्च 2021 ते 10 एप्रिल 2022 दरम्यान हा प्रकार घडला. छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी आल्या व त्यांनी मंगळवारी रात्री बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर पती नागेश दिलीप डोळसकर, सासरे दिलीप मोतीराम डोळसकर, सासू दीपाली दिलीप डोळसकर (ए विंग, 303, व्ह्यू अपार्टमेंट, न्यू म्हाडा कॉलनीसमोर, पवार नगर, अहमदनगर) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला हवालदार सीमा चौधरी करीत आहेत.