प्लॉस्टीडीया फाऊंडेशनतर्फे ‘प्लॅस्टीडीया 2018’चे आयोजन

0

जळगाव । प्लॉस्टीडीया फाऊंडेशन यांच्यासह भारतातील सर्व प्रमुख प्लास्टिक संघटना व संस्थातर्फे ‘प्लॅस्टीडिया 2018’ चे गुजराथ राज्यातील गांधीनगरमध्ये 7 ते 12 फेब्रुवारी 2018 दरम्यान आयोजन करण्यात आले असून यात भारतातील प्रमुख प्लॉस्टीक कंपन्या सहभागी होणार असून यात तज्ञ उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी प्लॉस्टीक वस्तूचे पदर्शन करण्यात येणार असून टाकावू प्लॉस्टीक पासून पुन्हा वापरात येणार्‍या वस्तू बनविता येतात याबाबत मार्गदर्शन करत आपणही उद्योजक होवू शकता याची सखोल माहिती देण्यात येणार असल्याची माहिती प्लॉस्टीडीया फाऊंडेशनतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. 1 लाख 25 हजार चौ.मी.च्या जागेवर येत्या 7 ते 12 फेब्रुवारी 2018 दरम्यान गुजरात राज्यातील गांधीनगर येथे ‘प्लॅस्टीडिया 2018’ आयोजन करण्यात आले सून या प्लास्टीडियामध्ये जगभरातून 40 देशातील 2 हजार प्रदर्शक सहभागी होणार असून त्यात 500 ते 700 जण अंतरराष्ट्रीय प्रदर्शक उपस्थित राहणार आहे.

अभ्यासाची सर्वंकष दृष्टी ठेवा
वापी गुजरातमध्ये प्रथम प्लास्टिक विद्यापीठाची उभारणी करणारी काही कामे, प्लास्टिक व पर्यावरणविषयक काम करणे, प्लास्टिकचा योग्य वापर, प्लास्टिकपासून रस्ते बनविणे यांसह प्लास्टिकचे तंत्रज्ञान आदी गोष्टींची यावेळी माहितीही सहभाग घेण्यार्‍यांना देण्यात येणार आहे. जगभरातून अंदाजे 2 लाख हून अधिक व्हिजीटरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती विनोद बियाणी, रवी लढ्ढा, सचिन चोरडीया, भुवनेश्‍वर सिंग, डॉ. समीर जोशी, चंद्रकांत तुरासीया, मुकेश शाहा यांनी सांगितले. दरम्यान, ‘प्लॅस्टीडिया 2018’ मध्ये 100 टक्के प्लॅस्टिक रीसायकल केलेल्या बाटल्यांची जगातील सर्वात मोठी टी-शर्ट बनविण्याचा प्रयत्न केला जाणार असून हा टी-शर्ट 100 मीटर लांबी तर 70 मीटर रूंदी असा असून त्याचे 2500 पेक्षा जास्त वजन राहणार आहे. यासंदर्भातील माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावी यासाठी शनिवारी जळगाव शहर व जिल्ह्यातील व विदर्भातील उद्योगपतींना बोलावून माहिती देण्यात आले आहे.