प. जवाहरलाल नेहरू शाळेला ई- लर्निंग संच भेट

0

चिंबळी : जानकीदेवी बजाज एज्युकेशनल इनिसिएटिव्ह या संस्थेतर्फे सीएसआर निधीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चर्‍होली येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेला एलईडी टीव्ही, ई-लर्निंग साहित्य, तसेच क्रीडा साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. महापौर नितीन काळजे यांनी हे साहित्य प्राथमिक शाळेकडे सुपूर्द केले. यावेळी महापालिका महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा सुनीता तापकीर, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, विनया तापकीर, मुख्याध्यापक नामदेव उथळे, जानकीदेवी बजाज एज्युकेशनल इनिसिएटिव्ह संस्थेचे के. बी. वाळके, हेमांगी ठोनावाला, शाळा समन्वय समिती अध्यक्ष पांडूरंग पठारे, उपाध्यक्ष सुनील तापकीर आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी क्रिडा साहित्याची गरज
काळजे म्हणाले, माहिती-तंत्रज्ञान आणि संगणकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेबरोबरच संपूर्ण अद्ययावत माहिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी ई-लर्निंग साहित्याची आवश्यकता आहे. माहिती माध्यमांमध्येच विद्यार्थी गुंतून न राहता आरोग्य आणि क्रीडा यांची सांगड घालण्यासाठी क्रीडा साहित्यही उपलब्ध असणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेषत: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ते दुरापास्त होऊ नये, म्हणून सातत्याने असे शालेय साहित्य, क्रीडा साहित्य भेट देण्याचे उपक्रम राबविणे गरजेचे आहेत, असेही महापौर काळजे म्हणाले.