प.रा. विद्यालयात ऐतिहासिक वस्तू प्रदर्शन

0

धरणगाव । शिक्षणातून विद्यार्थ्यांना अनेक ऐतिहासिक गोष्टीची माहिती व्हावी शालेय अभ्यासक्रमात ज्या गोष्टींचा समावेश आहे अशा विविध विषयांवर चर्चा, भेटी,प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना संबधीत विषयाची जाणिव करून देणे उपयुक्त ठरते. नाणे, तिकीट या वस्तूच्या प्रदर्शनातून देशातील इतिहास जमा झालेले वस्तू ची माहिती विद्यार्थ्यांना होईल प.रा.विद्यालयाचा हा उपक्रम प्रेरणादायी असे मत गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर यांनी व्यक्त केले. पी.आर.हायस्कूल मध्ये आयोजित ऐतिहासिक वस्तू च्या प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक अजयभाऊ पगारीया होत. व्यासपीठावर ऐतिहासिक वास्तू चे संग्राहक प्रभाकर नेरपगार, मुख्याध्यापक सुनील मिसर उपमुख्याध्यापक बी.एन.चौधरी, प्रकल्पाचे आयोजक गणेशसिह सुर्यवंशी, डॉ.संजीवकुमार सोनवणे, बापू शिरसाठ, आदी उपस्थित होते.

मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
यावेळी बोलतांना श्री.बाविस्कर म्हणाले विद्यार्थ्यांसाठी विविध देशांचे ध्वज,जुनी नाणी, पोस्ट तिकीटे,हस्ताक्षर याची माहिती हा एक अमूल्य ठेवा आहे इयत्ता नववी च्या इतिहास अभ्यासक्रम वर अधारीत हा उपक्रम आदर्श असून असे उपक्रम शैक्षणिक श्रेत्रात राबविणे गरजेचे आहे. व्यवसायाने टेलर असलेले संग्राहक प्रभाकर नेरपगार यांनी वयाच्या 83 व्या वर्षी छंद जोपासून ठेवला आहे पाच हजार विविध वस्तूचा संग्रह त्यांच्या कडे आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ही बाब अभिमानाची आहे असे अजय पगारीया यांनी नमूद केले. व्यंगचित्रकार प्रा.बी.एन. चौधरी, प्रभाकर नेरपगार, मुख्याध्यापक सुनील मिसर यांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आहे. प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांना यापूर्वीच्या चलनाची माहिती झाली म्हणून उत्सुकता दिसत होती वयाच्या 83 व्या वर्षी प्रभाकर नेरपगार शिवणकाम सह बैलांच्या अंगावरील झुल शिवतात याचा गौरव उपस्थितांनी केला. त्यावेळी या प्रदर्शनाचे दीड हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

सशस्वितेसाठी यांचे परीश्रम
यावेळी विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात तृतीय क्रमांक मिळविल्या बदल कु. चेतना सुर्यवंशी, मार्गदर्शक महेश पाठक, निरज शिंदे यांचा तर प्रयोग शाळा परिचर गटात प्रथम क्रमांक पटकाविला. निवड झालेल्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्‍वर गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.आर. सुर्यवंशी, सुत्रसंचलन डी.एस.पाटील यांनी तर आभार शरदकुमार बन्सी यांनी मानले.