जळगाव- के.सी.ई.सोसायटीच्या गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय एम.जे.कॉलेज जळगाव येथे कावयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेच्या मुख्यापीका रेखा पाटील यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अरे संसार संसार …. , मतलबी माणूस……, देव अजब गारोडी ……, माझी माय सरोसती….., मन वढाय वढाय……, खोप्यामधी खोपा……., अशा विविध गीतांच्या माध्यमातून संसारातील वेगवेगळ्या प्रसंगांचे चित्र विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर उभे केले तर काही विद्यार्थ्यांनी बहिणाबाई चौधरी यांचा जीवनपरिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या याशस्वितेसाठी योगेश सुने , कल्पना तायडे , सुवर्णा सोनवणे , दिपाली पाटील , सरला पाटील , योगेश भालेराव आदींनी परिश्रम घेतले. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.