जळगाव : के.सी.ई. सोसायटीच्या गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा होत आहे त्यातच आज बालगोपालांनी अथर्वशीर्ष पठणाने गणेशाचा जागर करून विद्यालयाचा परिसर चैतन्यमय केला. सर्वप्रथम मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली.त्यांनतर गणपती अथर्वशीर्षाच्या सामूहिक पठणाला प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमात एकूण 206 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 11 आवर्तने अतिशय सुरेल आवाजात पठण केली.त्यांनतर उपशिक्षिका सरला पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक आवर्तनाचा अर्थ समजावून सांगितला.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातून शांततेचे व कलेचे प्रदर्शन घडवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षिका कल्पना तायडे ,दिपाली चौधरी ,योगेश भालेराव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.