प.वि. पाटील विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री जयंती साजरी

0

जळगाव : के.सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय जळगाव येथे महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेखा पाटील व म.गांधी यांची वेशभूषा केलेल्या गिरीष मनोज सोनवणे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी म.गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनाचा परिचय करून देत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला व ‘अहिंसे’चा संदेश प्रत्येकाजवळ पोहचवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्रअध्यापिका कु.देवयानी जगताप व कायनात सैय्यद यांनी केले तर आभार प्रियांका सोनार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरला पाटील ,कल्पना तायडे ,नेमीचंद झोपे, कमलेश वंजारी, दिपाली चौधरी, अशोक पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.