मुंबई : शाओमी येत्या बुधवारी भारतात आयोजित करणार आहे. 6 एप्रिलला कंपनीने एक रुपयांच्या फ्लॅश सेलचे आयोजन केले आहे. याशिवाय अनेक डिव्हाईसवर डील आणि ऑफरही या फेस्टिव्हलमध्ये देण्यात आल्या आहेत.
एक रुपयाच्या फ्लॅश सेलमध्ये भाग घ्यायचा असल्यास शाओमीचे अॅप असणे गरजेचे आहे. तसेच हा सेल बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच आहे. यामध्ये रेडमी नोट 4, बँड 2 आणि 10000 एमएएच पॉवरबँक हे केवळ एक रुपयांत खरेदी करता येणार आहेत. याशिवाय 3 एप्रिल ते 5 एप्रिलमद्ये दररोज सकाळी 10 वाजेपासून 50 रु., 100 रु., 200 रु., आणि 500 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट कूपन मिळवता येणार आहेत. तसेच एसबीआयच्या डेबिट कार्डधारकांना 5,000च्या खरेदीवर 5 टक्के सूट मिळणार आहे.
बुधवारी दुपारी 12 वाजता शाओमी रेडमी नोट 4चा देखील सेल होणार आहे. फॅन फेस्टिव्हलमध्ये चळ इन इअर हेडफोन प्रो वर 200 रु. डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना 1599 रु. खरेदी करता येणार आहे. याशिवाय या सेलमध्ये शाओमी चळ मॅक्स प्राइम स्मार्टफोन 19,999 रुपयात उपलब्ध असणार आहे. हा फोन ग्राहक ईएमआयवर देखील खरेदी करू शकणार आहेत.