फक्त ट्विटरवरून निषेध नको, 56 इंचाची छाती दाखवा

0

मुंबई:- अमरनाथ यात्रेकरूवर झालेला हल्ला हा दिल्लीतील मजबूत आणि हिम्मतबाज सरकारवर हल्ला आहे. हा या देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्याचा फक्त ट्विटरवरून निषेध करून चालणार नाही. हे सरकार खऱ्या अर्थाने हिम्मतबाज ५६ इंच छातीचे सरकार आहे, हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे. हम झुकेंगे नहीं, डरेंगे नही भूमिका न घेता कठोर पावले उचला. अशा शब्दात शिवसेनेच्या वतीने खा. संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, १९९६ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे अमरनाथ यात्रेकरूंना संरक्षण दिलं होतं. तशी कठोर पावलं टाकणे गरजेचं आहे. आता चर्चा नको. आता कोणतीही वैचारीक भुमिका नको. आता फक्तं या हल्ल्याचा बदला घेणे आणि देशासमोर एक चांगलं चित्र उभे करणे ही आमची भूमिका आहे, असे ते म्हणाले.

कन्नड वैदिकांचे तोंडही पहायचे नाही!
यावेळी राऊत म्हणाले की, कन्नड वैदिकांचे आम्हाला तोंड ही पाहायचे नाही. आम्हाला त्यांच्या व्यासपीठावर जाण्याची इच्छा नाही. याच कन्नड वेदिकेवाल्यांनी बेळगांव महापालिका बरखास्त करण्यासाठी अट्टहास केला. सीमा भागातील मराठी बांधवांवर अत्याचार करण्यासाठी पुढाकार घेतला. सीमा भागातील मराठी महापौरांच्या तोंडाला काळं फासले. त्यांना बेंगळुरू मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. अशा कन्नड वेदिकेवाल्यांशि शिवसेनेचा राजकिय दृष्ट्या कोणताही संबंध नाही. आमची लढाई सीमा भागातील मराठी बांधवांसाठी आहे. आणि ती कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.