फक्त 19 कंपन्यांनी सरकारला लावला 1 लाख 52 हजार कोटींचा चुना

0

नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने नुकतेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १९ कंपन्यांनी तीन वर्षात सरकारला १ लाख ५२ हजार कोटी रूपयांची करचोरी करून चुना लावला आहे. ही इतकी मोठी चोरी आहे की पुढील १९ वर्षे मुंबई आणि बंगळूरू शहरांचे बजेट या पैशांत चालू शकेल. १ एप्रिल २०१४ ते ३० जून २०१७ या कालावधीत ही करचोरी झालेली आहे. बंगळूरू महानगरपालिकेचे या वर्षीचे बजेट आठ हजार कोटी आहे, तर महानगर पालिकेचे वार्षिक बजेट २५ हजार कोटी आहे.

प्रत्यक्ष करांमध्ये ७६ कोटी २३९ कोटीची करचोरी झाली आहे, तर अप्रत्यक्ष करामध्ये ७६ हजार ५३५ कोटी रूपयांची चोरी नोंदली गेली आहे. सेवा करांची ४७ हजार १८८ कोटी रूपये तर उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कांची अनुक्रमे १८ हजार ९५४ आणि १० हजार ३९२ रूपये इतकी कर चोरी कंपन्यांनी केली आहे. यात विदेशी कंपन्यांकडे अजून आयकर विभागाने लक्ष वळवलेले नाही.