पुणे । अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढ देऊनदेखील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाही.
पहिल्या गुणवत्ता यादीत 48 हजार 324 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. आतापर्यंत 24 हजार 672 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. अनेक जणांनी प्रवेश न घेतल्याने प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटच्या दिवशी शुक्रवारी फक्त 858 विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला. उरलेल्या 23 हजार 256 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही.
19 हजार 991 विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीतून पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य होते. त्यातील 14 हजार 552 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले तर, 5 हजार 439 विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला नाही.