फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

0

पुणे : दिवाळीमध्ये फटाके वाजवताना दिसणारा प्रकाश न पाहता दिव्याच्या ज्योतींचा लखलखता प्रकाश अनुभवण्यासाठी अभिनवच्या एनएसएस च्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एनएसएस विभागातर्फे यंदाही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी जनजागृती करण्यात आली.

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी मृणाली बावडेकर, गौरी अवसरे, गायत्री दुबे, ईशा मोहिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्युनिअर कॉलेजमधील एनएसएस विभागासारखे फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली, तर भविष्यात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर शिल्लक राहिलेला दिवाळीचा फराळ वाया न घालवता गरीब आणि अनाथ लोकांना देण्यासंबंधी आवाहन करून ज्यांना कधीच दिवाळी माहिती नाही, अशा अनाथ मुलांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी विनंती प्रीती गायकवाड, पूजा बल्लमखाने, मधुलिका बबलाद,आणि स्वराली गव्हाणे यांनी केली. कार्यक्रमासाठी प्राचार्या वर्षा शर्मा, कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, अ‍ॅड. दिलीप जगताप यांनी उपक्रमाचे कौतुक केले.