जळगाव । मध्यरात्री फटाके फोडल्याने बाजूच्या झोपडीत बांधलेल्या बकर्या घाबरून उड्या मारू लागल्याने तरूणांना दुर फटाके फोडा असे सांगण्याचा राग आल्याच्या कारणावरून चौघांनी पती व पत्नीस मारहाण केल्याची घटना यावल तालुक्यातील निमवाडा येथे घडली असून यात महिलेला गंभीर असून जिल्हा रूग्णालयातून खासगी रूग्णालयात हलविण्यात आले.
हटकल्याचा आला राग
संबंधित तरुण डॉ.आंबेडकर जरंतीच्रा तरारीसंदर्भात जल्लोष करतांना त्रांनी फटाके फोडल्यामुळे झोपडीत बांधलेल्या बकर्या उड्या मारत असल्याचे पाहून कल्पना तायडे यांनी हटकून फटाके दुर फोडण्याचा राग आला होता. त्यांना या बोलण्याचा राग आल्याने आरोपी प्रशांत संजय तायडे, मुकेश संजय तायडे, माधुरी मुकेश तायडे, व कमलबाई संजय तायडे या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करत असल्याचे पाहून संजय तायडे हे धावून आल्याने त्यांना देखील मारहाण करत जखमी केले. आरोपी प्रशांत तायडे यांनी लाकडी दांडूका महिलेच्या डोक्यावर मारल्याने त्यांच्या डोळ्यावरील भागात व मागच्या भाग जखमी झाला आहे. तातडीने दोघांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्यांच्या रक्ताचे गाठी तयार झाल्याने, पुढील उपचारार्थ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.