फडणविसांना नोटीस : भाजपाने केली होळी

महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविरोधात भुसावळ शहर व विभागात भाजपा पदाधिकारी आक्रमक ; जोरदार घोषणाबाजी

भुसावळ : राज्यातील पोलिस बदल्यांचा घोटाळा उघड केल्यानंतर तोंडघशी पडलेल्या महाविकास आघाडी सरकारने दडपणशाही धोरण अंवलंबवत पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. याचे पडसाद रविवारी राज्यासह भुसावळ विभागातही उमटले. भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी नोटीसीच्या प्रती जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत रविवारी जोरदार घोषणाबाजी केली.

वरणगाव बसस्थानकात सरकारविरोधात घोषणाबाजी
वरणगाव : वरणगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने बसस्थानक चौकात रविवारी पोलिसांनी दिलेल्या नोटीसची होळी करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, शहराध्यक्ष आकाश निमकर, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, शामराव धनगर, सुधाकर चौधरी, पप्पू ठाकरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा पाटील, वरणगाव शहराध्यक्ष प्रणिता पाटील-चौधरी, के.के.अंभोरे, गोलू वंजारी, संदीप माळी, डॉ.नाना चांदणे, अंकुश साबळे, आकाश महाजन, नरेंद्र बावणे, छोटू सेवातकर, गंभीर माळी, बाळू धनगर, भरत चंदने, रामभाऊ माळी, स्वप्नील पवार. मुस्लिम भाई अन्सारी, शहराध्यक्ष डी.के.खाटीक, कस्तुराबाई इंगळे आदी उपस्थित होत्या.

रावेरात पदाधिकार्‍यांनी केली नोटीसीही होळी
रावेर : रावेरातील भाजपा कार्यालयासमोर नोटीसीची रविवारी सकाळी होळी करून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, पंचायत समितीचे माजी सदस्य जुम्मा तडवी, पी.के.महाजन, धनगर नेते संदीप सावळे, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील, सी.एस.पाटील आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.