फडणवीसांच्या काळातील पुन्हा एक निर्णय बदलला; मंत्री सत्तार यांची घोषणा

0

मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील अनेक निर्णय बदलण्यात आले. यामुळे महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील झाली. थेट जनतेतून सरपंच निवडीची प्रक्रिया असेल किंवा इतर असे अनेक निर्णय ठाकरे सरकारने बदलले. दरम्यान फडणवीस यांच्या काळात घेतलेला एक निर्णय बदलण्यात आला आहे. घरबांधणीची मंजुरी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्याची घोषणा महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. त्यामुळे आता ग्रामपंचायत हद्दीत घरबांधणीचे अधिकार ग्रामपंचायतीकडे असणार आहे.