फडणवीसांना प्रत्युत्तर देत नाही परंतु त्यांनी ‘त्या’ वक्तव्यावरून माफी मागावी; आदित्य ठाकरे आक्रमक

0

मुंबई : एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावरील आंदोलनात शिवसेनेवर तीव्र शब्दात टीका केली होती. शिवसेनेने बांगड्या घातल्या आहेत का? असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. बांगड्यांवरुन फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला पर्यावरण नेते आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माफी मागण्याची मागणी केली आहे. “देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. सर्वात शक्तीशाली महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहेत. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.