फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव; ट्वीटरवर ट्रेंड !

0

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. फडणवीस यांच्यावर सोशल मीडिया तसेच विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. ट्वीटरवर फडणवीस “पूर्व मुख्यमंत्री” ट्रेंडवर असून देशभरातून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहे. गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या “असेच महाराष्ट्रासाठी काम करत राहा,” असे अमित शहा यांनी ट्वीट केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.