मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांचा समावेश केला नाही. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी त्यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात फडणवीसांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.
या दोन प्रकरणाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी हेतूपुरस्पर लापाविल्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. याबाबत फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागणार असून त्यांच्या अडचणीत तूर्तास तरी वाढ झाली आहे.