मुंबई- केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्ण घटकाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण दिले आहे. संपूर्ण देशात हा आरक्षण लागू होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने आर्थिक दृष्टया मागास वर्गाच्या आरक्षणा संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आर्थिक दृष्टया मागास वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.