फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ

जामनेर:येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात साठ वर्षावरील ज्येष्ठांना व पंचेचाळीस वर्षावरील कोमॉरबीड यांना करावयाच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पं.स.चे उपसभापती एकनाथ लोखंडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. फत्तेपूर परिसरात आरोग्य सेविका कविता वाहूळे यांच्याकडून सर्वात पहिली लस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दगडू चौधरी यांना देण्यात आली.

फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हिशिल्ड लसीचे 200 डोस प्राप्त झाले आहे. 60 वर्षेवरील नागरिकांनी व 45 वर्षेवरील कोमॉरबीड म्हणजे ज्यांना बी.पी., शुगर, कॅन्सर आदी आजार असणार्‍या नागरिकांनी ज्यांच्याजवळ विहित नमुन्यातील रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर यांचे सर्टिफिकेट आहे. त्यांनी पहिले ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही कोरोनाची लस देण्यात येणार आहे.
या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका सुनंदा सोनवणे यांना प्रथम जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल हा आदर्श परिचारिकेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल उपसरपंच ईश्वर राजपूत, सलीम पटेल, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, रवींद्र भन्साली, ईश्वर मंडलेचा, पत्रकार अभयसिंग राजपूत, डॉ.योगेश राजपूत, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. कुणाल बावस्कर, डॉ.सागर सोनाळकर, डॉ. श्यामल इंगळे, डॉ. धनंजय राजपूत, मनीषा वाकोडे, भागवत वानखेडे, पुरुषोत्तम वाणी, सुनील पाटील, युवराज वाघ, कृष्णा शिंदे, किशोर शहाणे, गजाजन माळी, वैशाली खंडारे, संगीता कल्याणकर, अनंता अवचार, अमोल वाघ, मनीषा शेळके आदी उपस्थित होते.