फरकांडे शिवारात खैर व धावडा वृक्षांची सर्रास कत्तल

0
बोदवड :  मुक्ताईनगर वनक्षेत्रातील रुईखेडा परीमंडळातील आमदगावजवळच्या फरकांडे मारोती शिवारात धावडा व खैर वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. वनविभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षप्रेमी संतप्त झाले आहेत. फरकांडे शिवारात अनेक ठिकाणी खैर जातीच्या व धावडा जातीच्या वृक्षांची सर्रास कत्तल सुरू आहे तर अनेक ठिकाणी वृक्षांचे ढिग दिसून आले.
काही ठिकाणी वृक्ष जळाल्याचे प्रकारही उघड झाले आहेत. हा सर्व प्रकार वन कर्मचार्‍यांच्या संगनमताने की त्यांना याबाबत काही माहितीच नाही? असा प्रश्‍न आता वृक्षप्रेमी विचारू लागले आहेत. मुक्ताईनगरचे वनक्षेत्रपाल टी.पी.वराडे यांना भ्रमणध्वनवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.