फरार गुन्हेगार बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात

0

भुसावळ : शहरातील विविध गुन्हे दाखल झाल्यापासून फरार असलेला आरोपी शहरात आल्याची माहिती मिळाल्यावरुन बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून त्यास शनिवार 17 रोजी अटक करुन ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक सरोदेंना मिळाली माहिती
येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेला फरार आरोपी विक्रांत उर्फ विक्की गणेश देवपुजे रा. शिवाजी नगर याच्याविरुध्द अवैधरित्या शस्त्र बाळगून हल्ला केल्याचा गुन्हा 15 एप्रिल 2016 रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून हा आरोपी फरार होता. तो शहरात आल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक आतिश शेळके, हेडकॉन्स्टेबल आनंदसिंग पाटील, तुषार जावरे, कॉन्स्टेबल विकास सातदिवे यांनी बसस्थानक परिसरात सापळा रचुन विक्की देवपुजे यास ताब्यात घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.