अक्कलकुवा । येथे महाराष्ट्र फर्टिलायझर असोसिएशन (मापदा) ची अक्कलकुवा तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मापदाचे जिल्हाध्यक्ष श्यामभाई राजपुत उपस्थित होते. महाराष्ट्र फर्टिलायझर असोसिएशन (मापदा) ही संघटना शेतीसाठी बी-बियाणे, खत विक्री करणार्या विक्रेत्याकरीता ही संघटना आहे. अक्कलकुवा तालुका कार्यकारणी गठित करण्यासासाठी शेतकी संघ कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी जिल्हा उपाध्यश विश्वासराव मराठे, तळोदा तालुकाध्यक्ष शांताराम पाटिल उपस्थित होते.
अक्कलकुवा येथे सभेचे आयोजन
या सभेत संघटनेची अक्कलकुवा तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात तालुका अध्यक्ष ब्रिजलाल जैन, उपाध्यक्ष विनय जैन, सचिव सुरेश जैन, खजिनदार मनोज मराठे, तर सदस्य म्हणून योगेश मराठे, मुकेश पटेल, रोहिदास माळी, राजेश पटेल, धडकु पाटिल, मनोज जैन, सुधीर सूर्यवंशी, कल्पेश जैन, विक्की चौधरी, शांतिलाल जैन, मनोज जैन, जितेंद्र जैन,मिलिंद भावसार आंदिची निवड करण्यात आली. आज खत, बी-बियाणे, विक्री करतांना विक्रत्यांना अनेक अडचणी येत असतात, त्या अडचणी सोडवण्याचा काम ही संघटना करीत आहे. त्याचा औचित्यसाधुन अक्कलकुवा येथे ह्या संघटना स्थापन करण्यात आली. सूत्रसंचालन संजय बुवा यांनी केले तर आभार योगेश मराठे ह्यांनी मानले.