नवी दिल्ली । भारतासाठी किवा कांगारूसाठी हा सामना महत्वपुर्ण होता.त्यामुळे मालिकेतील निर्णायक सामना असल्याने आम्हाला जिंकणे अपरिहार्य होते. जेव्हा मी फलंदाजीला गेलो होतो तेव्हा मला दोन-तीन चांगले बाऊन्सर आले होते. ड्रेसिंग रुममध्ये परतत असतानाच मी जास्तीत जास्त बाऊन्सर टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण बाऊन्सर टाकताना गोलंदाजीत अधिकचा आक्रमकपणा येणार नाही, याचीही काळजी घेण्याचे ठरवले होते.माझ्या योजनेनुसारच गोलंदाजी केली.त्याचा मला व माझ्या संघाला फायदा झाला.असे उमेश यादवने सांगितले.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने धरमशाला कसोटीत केलेल्या भन्नाट गोलंदाजीने सर्वांचेच मन जिंकले. अचूक टप्प्यातील उमेशच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बिथरलेले पाहायला मिळाले होते. कसोटीच्या तिसऱया दिवशी उमेशने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये दोन विकेट्स घेतल्या, तर इनिंग संपताना त्याने आणखी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा डाव भारताने 137 धावांतच गुंडाळला होता.