फलंदाज बॅटशिवाय खेळण्यास मैदानावर

0

ऑस्ट्रेलिया । सामना खेळण्यासाठी एखादा फलंदाज फलंदाजी मैदानावर जात असतांना पॅड्स, हेल्मेट,बॅट घालून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी जात असतो. त्यावेळी बॅटने विरूध्द संघाची गोलंदाजी फोडून काढण्याच्या इराद्याने येतो. मात्र ऑस्ट्रेलियात एका सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय खेळाडू फवाद अहमदसोबत एक अजब किस्सा घडला. ऑस्ट्रेलियातील एका सामन्यात फवाद अहमद
मैदानात उतरला.

सहकार्‍याने बॅट दिली
मैदानात उतरुन खेळपट्टीकडे जाणार्‍या फवाद अहमदकडे बॅटच नव्हती. मैदानात फलंदाजीसाठी जाताना फवाद बॅटसोबत घ्यायलाच विसरला होता. ऑस्ट्रेलियातील एका सामन्यादरम्यान पाकिस्तानात जन्मलेला फवाद पॅड, हेल्मेट घालून अगदी तयारीत मैदानावर आला. पण फवाद बॅट घ्यायला विसरला होता. बॅट न घेताच फवाद फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीकडे निघाला होता. खेळपट्टीवर पोहोचण्याआधी ही बाब फवादच्या लक्षात आली आणि तो सीमारेषेकडे वळला. त्यावेळी त्याच्या संघातील सहकार्‍याने त्याला बॅट दिली. यानंतर बॅट घेऊन पुन्हा मैदानाकडे निघालेला फवाद हा किस्सा कोणाच्या लक्षात तर आला नाही ना, कोणी आपल्याला बॅटशिवाय मैदानात जाताना पाहिले तर नाही ना, असा विचार करत असल्याचे त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते. या सामन्यात फवादने सात चेंडूंचा सामना केला.