मुंबई । ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज नेहमी रॉकस्टार म्हणून मला हाक मारायचे. पण ते अशी हाक का मारतायेत हे मला कळत नव्हते. शेवटी एका मित्राकडून त्याचा अर्थ समजावून घेतल्याची स्पष्ट कबुली भारताचा फिरकी गोलंदाज आणि मधल्या फळीतला फलंदाज रविंद्र जडेजाने दिली. कॅस्ट्रॉल ल्युब्रिकंट या कंपनीने दुचाकीच्या मेकॅनीकांसाठी आयोजित केलेल्या कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनीक स्पर्धेच्या विजयी चषकाचे अनावरण करण्यासाठी जडेजा मुंबईत आला होता. त्यावेळी बोलताना जडेजाने ही आठवण सांगितली.
श्रीलंकेत जडेजा ठरेल फायदेशीर
जडेजा म्हणाला की. वॉर्न नेहमी रॉकस्टार म्हणून संबोधयाचे. मला गाता येत नाही, नाचता येत नाही मग वॉर्न नेहमी रॉकस्टार म्हणून का हाक मारतात असा प्रश्न पडायचा. शेवटी एका मित्राला विचारल्यावर तो म्हणाला की, तु नेहमी हसमुख असतोस म्हणुन ते तुला त्या नावाने हाक मारत असावेत. भारतीय संघ पुढील आठवड्यात श्रीलंकेच्या दौर्यावर जाणार आहे. दीड महिन्याच्या दौर्यात भारतीय संघ लंकेत तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी-20 क्रिकेटचा सामना खेळणार आहे. श्रीलंकेतील संथ खेळपट्ट्यांवर जडेजा कोहलीसाठी फायदेशीर ठरू शकतो.