फलक विटंबनेप्रकरणी कारवाईची मागणी

0

मुक्ताईनगर : अमळनेर येथे संताजी जगनाडे महाराज या नावाने लावण्यात आलेल्या लोखंडी फलकावर काही समाजकंटकांनी गारा फेकल्याचे आढळून आले.

याप्रकरणी कारवाईची मागणी समाजबांधवांतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. फलकावर गारा फेकून त्याची विटंबना केल्याप्रकरणी संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या आहे.

अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार
प्रशासनाने याची दखल घ्यावी व संबंधित समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.