फैजपूर । अमळनेर येथे रात्रीच्या अंधारात अज्ञात समाजकंटकांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करुन विटंबना केली. याप्रकरणी संबंधित समाजकंटकांचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी समाजबांधवांनी केली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
कारवाई करण्याची मागणी
समाजातर्फे नुकतेच निवेदन देण्यात येवून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तसेच समाजा-समाजात तेढ निर्माण करुन गावाची शांतता व सुव्यवस्था बिघडविणार्या समाजकंटकांचा शोध घेवून त्यांना अटक न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर अध्यक्ष सुरेश कपले, संजय काचकुटे, एकनाथ मंडवाले, अनिल तेली, रविंद्र तेली, रविंद्र त्र्यंबक तेली, किरण मंडवाले, गणेश कपले, किशोर कपले, विनोद मंडवाले, संजय चौधरी, उदय चौेधरी, उज्वल मंडवाले, मनोज मंडवाले, जगन्नाथ गलवाडे, दिलीप तेेली, विनोद मंडवाले, कैलास कपले, दिलीप मंडवाले, गणेश तेली, संजय वानखेडे, प्रकाश कपले आदींच्या स्वाक्षर्या आहेत.