फळप्रक्रिया विभागातील सहकार्‍यांना दिले प्रशिक्षण

0

जळगाव । जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेडच्या सहकार्‍यांसाठी फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅडर्ड थॉरिटीज ऑफ इंडियातर्फे जैन फूडपार्कमध्ये प्रगत स्तरावरचे ‘एफएसएसएआय फोस्टॅक’ प्रशिक्षण शिबीर 26 व 27 फेब्रुवारीदरम्यान झाले. यामध्ये कंपनीतील फळ प्रक्रिया विभागातील सहकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन डॉ.के.यू. मेठेकर यांनी केले. प्रशिक्षक म्हणून सुमेधा जळगावकर आणि टी.यू.व्ही इंडियाच्या हेतल शल यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण कार्यक्रम व्यावसायिकांसाठी अनिवार्य
एफएसएसएआय ही भारतातील अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसाठीची नियामक संस्था आहे. या संस्थेने ‘एफएसएसएआय फोस्टॅक’ हा पुढाकार घेवून ‘अन्न सुरक्षितेता आणि प्रमाणपत्र’ कार्यक्रम हाती घेतला आहे. यात संपूर्ण भारतात सगळ्या अन्न पदार्थ व्यवसायिक संस्थांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि समान प्रशिक्षण पर्यावरण निर्माण करणे हा उद्देश आहे. या ‘फोस्टॅक’ प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्व परवानाधारक अन्न पदार्थ व्यवसायात कमीत-कमी एक प्रशिक्षीत आणि पर्यवेक्षक प्रत्येक 25 अन्नपदार्थ एका इमारतीत हाताळणार्‍यांमध्ये असणे जरूरी आहे.

विविध विषयांवर मार्गदर्शन
मान्यता प्राप्त प्रशिक्षण भागिदारांमार्फेत हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षक एफएसएसएआयने नियुक्त केले आहेत. हे प्रशिक्षक विविध संस्था आणि प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांमधून निवडले जातात. प्रशिक्षणानंतर एफएसएएसएआयने मंजूर केलेले मार्गदर्शक प्रशिक्षणाचा आढावा घेतात.