पिंपरी – फळगाड्यांशेजारी लघवी करताना हटकले म्हणून फळ विक्रेत्यावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास आळंदी रोड येथे घडली आहे. ओमकार त्रिंबक भोसले (रा. भोसरी) याच्या विरोधात भोसरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी रशीद रमजान शेख (वय 51 रा. वाळकेमळा भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. रशीद यांच्या फळाच्या रिक्षाच्या शेजारी लघवी करु नका असे रशीद यांनी ओमकारला हटकले याचा राग आल्याने ओमकार याने त्याचे मित्र अक्षय धोत्रे, करण लांडे व श्रीनिवास सुवर्णकार यांना बोलवून रशीद याला शिविगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लांडे याने ओमकारला त्याच्या जवळील कोयता दिला. यावेळी ओमकार याने रशीद यांच्या उजव्या हातावर, डाव्या खांद्यावर व डाव्या पायाच्या गुडघ्यावर वार केले. यामध्य रशीद हे जखमी झाले. याप्रकरणी पुढील तपास भोसरी पोलीस करत आहे