‘नो हॉकर्स’ झोनमध्ये मनपाची कारवाई; शहर पोलिस ठाण्यात तक्रार
जळगाव । महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक शुक्रवारी गांधी मार्केट येथील रस्त्यावरील नो हॉकर्स’ झोनमध्ये व्यवसाय करणार्या विक्रेत्यांवर अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही केली. यावेळी कारवाई करत असतांना फळ विक्रेता व त्यासोबत 2 जणांना पथकातील कर्मचार्यास शिवीगाळ व दमदाटी केल्याने वाद झाला. याप्रकरणी फळ विक्रेता सह अन्य 2 अनोळखी विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात मनपा कर्मचार्याने तक्रार केली. शहरातील नो हॉकर्स’ झोन वर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे अतिक्रमण काढण्याची मोहीम अंतर्गत आज सकाळी साडेअकराला पथक गांधी मार्केट येथे आले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फळ विक्रेते नो हॉकर्स’ झोन मध्ये लोटगाड्या लावल्या असल्याने त्यांच्यावर कारवाई करतांना विक्रेता इम्रान बागवान याची गाडी जप्त करत असतांना पथकातील कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी यांच्याशी वाद झाला.
वादाची व्हिडीओ दाखविला
वाद वाढत जावून विक्रेता इम्रान तसेच अन्य दोन जणांनी कर्मचारी कोळी यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याने काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. पथकातील कर्मचार्यांनी जप्त सामानासह ट्रॅक्टर थेट शहर पोलिस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच ज्ञानेश्वर कोळी यांच्या फिर्यादीवरून इम्रान बागवान व अन्य दोन जणांवर तक्रारीची नोंद केली आहे. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी कोळी यांच्याशी वाद व त्यांना शिवीगाळ केल्यानंतर फळ विक्रेता इम्रान बागवान सह अन्य दोन जणांनी घटनास्थळावरून पळ काढला. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिक्षक एच. एम. खान यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. घडला प्रकार जाणून घेत पोलिस ठाण्यात येवून कार्यवाही करतांना केली जाणार्या व्हीडीओ शुटींग मध्ये घडलेला प्रकार पोलिसांना दाखविल्यानंतर फळ विक्रेत्याविरुध्द तक्रार दाखल केली आहे.