जळगाव। बनावट कागदपत्रे तयार करून पिंप्राळा, निमखेडी शिवारातील जमीन हडप केल्याप्रकरणी 4 फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील तीन संशयीताना जामीनासाठी अतिरीक्त सत्र न्यायाधीश ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात दाखल केलेले अर्ज गुरूवारी फेटाळले आहेत.
अभय उमाकांत भंगाळे (वय 19,रा. गणेशकॉलनी) यांच्या मालकीचे प्लॉट निलेश विष्णू भंगाळे, विष्णू रामदास भंगाळे, प्रतिभा विष्णू भंगाळे, हेमकांत निळकंड भंगाळे, जगदीश माधव सोनवणे, मयूर शरद राणे यांनी संगनमत करून मे 2016 ते जून 2016 दरम्यान बनावट कागदपत्रे तयार करून हडप केले. या प्रकरणी अभय भंगाळे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सर्व संशयीताना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील हेमकांत भंगाळे, जगदीश सोनवणे, मयूर राणे यांनी न्यायाधीश दरेकर यांच्या न्यायालयात दाखल केलेले जामीनाचे अर्ज गुरूवारी फेटाळले आहेत. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर संशयीतातर्फे अॅड. सागर चित्रे यांनी कामकाज पाहिले.