मुक्ताईनगर। तालुक्यातील अंतुर्ली येथील एकविरा ज्वेलर्सचे मालक नंदकिशोर शामकांत सोनार याने 18 ठेवीदारांची 59 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुक्ताइनगर पोलिसांनी धडक कारवाई करत सोनार यास अटक केले होते. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर 14 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी त्यास मुक्ताईनगर न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान बुधवार 12 रोजी मुक्ताईनगर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सोनार याचा जमीन अर्ज न्यायालयासमोर आल्या नंतर फिर्यादी पक्षातील 6 जणांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याचा जमीन अर्ज फेटाळला.
18 ठेवीदारांच्या रूपयांची केली फसवणूक
तालुक्यातील अंतुर्ली येथील दिवाकर शामराव कुलकर्णी, दिपक दीवाकर कुलकर्णी, मालती दिवाकर कुलकर्णी, विकल्प विकास कुलकर्णी, राजेंद्र दुर्लभदास लोहार, रेखा राजेंद्र लोहार, गजानन राजेंद्र लोहार, हर्षल राजेंद्र लोहार, मीराबाई दिपचंद लोहार, कुंडालाल चुनीलाल जैस्वाल, कमलबाई कुंदनलाल जैस्वाल, सचिन कुंदनलाल जैस्वाल, दिनेश कुंदनलाल जैस्वाल, पुष्पांबाई प्रेमलाल जैस्वाल, कुसुम भास्कर कोळी, मालती निवृत्ती सोनार, रेखा बाळू भोई, कैलास हरी ढिवरे या 18 ठेवीदारांच्या वेगवेगळ्या रकमांसहित एकत्रित 59 लक्ष 45 हजार रुपयांची फसवणूक केली.
ठेवी ठेऊन पैसे न परत न केल्याने 18 ठेवीदारांनी जानेवारी 2017 मध्ये गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून सोनार हा फरार होता तर मध्यंतरी उचन्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता परंतु त्यानंतर वर्तमान स्थितीत न्यायालयाने अटकपूर्व जमीन नामंजूर केल्याने पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी त्यास अटक करून मुक्ताईनगर न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यास तात्काळ न्यायालयाने बुधवार पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान बुधवारी त्याने जामिनासाठी मुक्ताईनगर न्यायालयात दाखल केलेला जमीन अर्ज फेटाळण्यात आल्या ने सोनारचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.