फसवणुक प्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

0

जळगाव : 30 लाखांच्या जुन्या नोटा बदलून देण्याचे आमिष दाखवून फक्त सहा लाख रुपये परत करून 24 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शनिवारी पोलीसांनी एकाला अटक केली. त्या संशयिताला न्यायाधीश व्ही.एस.खेडकर यांच्या न्यायालयात दुपारी हजर करण्यात आले असता हजर केले असता त्याला 26 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजेश हेमराज सराफ (वय 42) यांची चंद्रशेखर कृष्णा चौधरी, चंद्रलेचखा चंद्रशेखर चौधरी दोघे रा. भादली तर जळगाव जनता बँक नेहरु पुतळा शाखचे सुनिल रामू जंगले यांनी सराफ यांचेकडून 30 लाख रुपये कमीशनवर बदलून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर सहा लाख रुपये बदलून देत 24 लाख रुपये स्वत:कडे ठेवून सराफ यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली. याप्रकरणी सराफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून संशयित चंद्रशेखर कृष्णा चौधरी याला अटक केली. त्या संशयिताला दुपारी पोलीसांनी व्ही. एस. खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले. न्या. खेडकर यांनी संशयितास 26 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. प्रमोद बडगुजर, मुळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. गोविंद तिवारी यांनी काम पाहिले.