फसवणूक करणारे दोघे जेरबंद

0

जळगाव। वसंतराव नाईक विकास मंडळाला बनावट कागदपत्रे देवून व्यावसायासाठी 7 लाख रुपये घेणार्‍या दोघांनी व्यावसाय सुरू न करता स्वत:च्या फायद्यासाठी रक्कम वापरून कर्जाची परतफेड न करणार्‍या दोन्ही भामट्यांना आज गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे.

ईश्‍वर रंगलाल पवार व गोपाल देविदास राठोड (रा. लिहातांडा, ता. जामनेर) यांनी 2011 ते 2016 दरम्यानात जळगावातील मायादेवीनगरामधील वसंतराव नाईक विकास मंहामंडळ शाखाकडे कर्जाची मागणी करत बनावट कोटेशन व शॉप अ‍ॅक्टचे लायसन कर्जप्रकरणी सादर करून 7 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर व्यावसायासाठी कर्जाची रक्कम न वापरता ती स्वत:च्या फायद्यासाठी वापरून कर्जाची परतफेड केली नाही. त्यानंतर दोन्ही फरार झाले होते. याप्रकरणी संस्थेची फसवुणक केली म्हणून दोघांविरूध्द रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दोन्ही भामट्यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या पोलिस कर्मचार्‍यांचे पथक तयार करण्यात आल्यानंतर भामट्यांबाबत माहिती मिळाली. पोनि. राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील उत्तमसिंग पाटील, दिलीप येवले, अशोक चौधरी, सतिष होळनार, बापू पाटील, दिपक पाटील, दत्तात्रय बडगुजर आदींनी फरार संशयित ईश्‍वर रंगलाल पवारव गोपाल देविदास राठोड यांना सापळा रचून ताब्यात घेतले.