फसवणूक प्रकरणाचा गुन्हा शहर पोलिसाकडे वर्ग

0

जळगाव : वडीलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी खोटे बक्षीसपत्र तयार करीत खोटी स्वाक्षरी करून तलाठी यांच्याकडे सादर करून भावाने बहीणीची फसवणुक केली. तिच्या नावावर असलेली शेतजमीन हडप केल्याप्रकरणी बहिणीच्या फिर्यादीवरून भावाविरुध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल होवून तो शहर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. गाझीयाबाद येथील कल्पना अतुल जेटली वय 60 यांचे जळगाव येथे माहेर आहे. शहरातील दिक्षीतवाडी येथील रहिवाशी असलेले मयत विश्वंभर शिवप्रसाद शर्मा यांना राजेश व रमेश नावाचे दोन मुले तर शोभा, कल्पना व साधना नाव्याच्या तीन मुली आहे. यातील मुलगा रमेश व मुलगी शोभा मयत झाले आहे. विश्वंभर शर्मा यांच्या नावावर शहरात, बांभोरी, करमाड, निमखेडी, पिंप्राळा, कुसुंबा, शिरसोली याठिकाणी शेत जमीनी होत्या.

सन 1999 पासूनचे प्रकरण
वडीलोपार्जित असलेली बांभोरी येथील मालमत्ता सोडून रजिस्टर ऑफीसमध्ये इतर मालमत्ताचे सन 1999 मध्ये हक्कसोडपत्र करून दिले. त्यानंतर सन 2017 मध्ये बांभोरी येथील शेतगट नं 247/1 हेकटर 0.59 आर पोट क्षेत्र 1 हेक्टर 56 आर एकूण क्षेत्र 2 हेक्टर 15 असे भाऊ राजेश विश्वंभर शर्मा याने बहीण कल्पना यांच्या नावाने 100 रुपयांच्या स्टॅम्प बनावट बक्षीसपत्र तयार करून त्या आधारे तलाठी बांभोरी यांना दोन्ही प्रत देवून 1 जुलै 2004 रोजी माझे नाव शेतातून कमी करून त्याच्या नावे शेतजमीन करून घेतली.

प्रकार लक्षात आल्याने कल्पना जेटली यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रार अर्जाची चौकशी होवून कल्पना जेटली यांच्या फिर्यादीवरून भाऊ राजेश विश्वंभर शर्मा यांच्याविरुध्द जिल्हापेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणुकीचा गुन्हा शहर पोलिसात वर्ग शर्मा कुटुंबिय दिक्षीतवाडी येथे राहत असल्याने सुरवातीला गुन्हा जिल्हापेठ पोलिसात दाखल करण्यात आला. परंतू कल्पना जेटली यांच्या नावाने तयार केलेले बनावट बक्षीसपत्र तहसिल कार्यालय परिसरात तयार करून सादर करण्यात आले असल्याने फसवणुकीचा गुन्हा शहर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.